Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ऐन दिवाळीत प्रवाशांना फटका; एसटीने केली मोठी भाडेवाढ!

ऐन दिवाळीत प्रवाशांना फटका; एसटीने केली मोठी भाडेवाढ!



मुंबई : खरा पंचनामा

राज्यात गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. त्यानंतर आता त्यामध्ये आणखी एका दरवाढीची भर पडली आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ केली आहे.

एसटीने दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार केली आहे. एसटीच्या या निर्णयानुसार, या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. सर्व सरकारी बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

एसटीकडून ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होणार आहे. तसेच, ज्या एसटी प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षित केले आहे. त्या प्रवाशांना तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे.

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येत्या ९ नोव्हेंबरपासून एसटीची जादा वाहतूक करण्यात येणार आहे. सणासुदीला गर्दीचा फायदा घेत खासगी बसचालक प्रवाशांकडून ज्यादा भाडे उकळतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या बसेस सोडण्यात येणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.