दिवाळीत एसटीची विक्रमी कमाई!
मुंबई : खरा पंचनामा
राज्य सरकारने महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिल्यामुळे एसटी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही भर पडताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या दिवाळीत एसटी महामंडळाने विक्रमी कमाई केली आहे.
विशेष म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी एसटी महामंडळाच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्नाची नोंद झाली आहे. एका दिवसात राज्यात एसटीने 37 कोटी 63 लाख रुपयांची कमाई झाली. एसटीच्या 75 वर्षांच्या इतिहासातील एक दिवसात मिळवलेल्या उत्पन्नापैकी हे सर्वाधिक उत्पन्न आहे. विशेष म्हणजे गर्दीचे आणि उत्पन्नाचे अनेक विक्रमही एसटीने मोडले आहेत.
यंदाच्या दिवाळीत 8 ते 27 नोव्हेंबर दरम्यान राज्य सरकारने एसटी प्रवासावर 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय होता. मात्र त्यानंतरही प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर एसटीला पसंती दिली. त्यामुळे 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान एसटीला तब्बल 510 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळले. तर ऐन दिवाळीत म्हणजे 8 ते 20 नोव्हेंबर दरम्यान तब्बल 390 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी एसटीच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्न मिळले असून एसटीने तब्बल 37 कोटी 63 लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत एसटी महामंडळाचे उत्पन्न जवळपास 800 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एसटी नफ्यात असणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.