Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

परभणीत मराठा आंदोलक आक्रमक, पूर्णा तहसील कार्यालयास लावली आग

परभणीत मराठा आंदोलक आक्रमक, पूर्णा तहसील कार्यालयास लावली आग



परभणी : खरा पंचनामा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात आठवड्यापासून आंदोलन सुरु आहे. काही जिल्ह्यांत आंदोलनास हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. आज (बुधवार) परभणी जिल्ह्यातील पूर्णा तहसील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न काहींनी केल्याचे समोर आले.

परभणी जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मराठा आंदोलनकर्त्यांनी भिंतीवरून उडी मारून तहसील कार्यालयात प्रवेश केला होता. तेथेच आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजीर करत थेट तहसीलदार यांच्या वाहनास लक्ष्य केले. यावेळी आंदोलनकर्त्या युवकाने तहसीलदारांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. त्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही युवकांनी घोषणाबाजी करत पूर्णा तहसील कार्यालयात आंदोलन केले. यावेळी काही आंदोलकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात पेट्रोल टाकून कार्यालयास आग लावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान अग्निशमन दलाने काही वेळातच कार्यालय परिसरात लागलेली आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी हानी टळली. त्यानंतर या परिसरात राज्य सुरक्षा दलाची तुकडी तैनात करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.