राजू शेट्टींसह २ हजार जणांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर : खरा पंचनामा
तब्बल ८ तास राष्ट्रीय महामार्ग रोखल्याप्रकणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेट्टी यांच्यासह २ हजार कार्यकर्त्यांवरपल देखील गुन्हा दाखल झाला आहे. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
बेकायदेशीररित्या पुणे- बेंगळूर महामार्ग कोल्हापूर येथे रोखल्याने कोल्हापूर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर महामार्गावर रस्ता आडवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे संपूर्ण वाहतूक यंत्रणा थांबली. तसेच नागरिकांची गैरसोय झाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
गत हंगामातील ऊसाला दुसरा हप्ता किमान शंभर रुपये मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (दि. २३) पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. पंचगंगा नदी पूल परिसरातील दर्याजवळ चक्काजाम आंदोलन केले. दुसऱ्या हप्तबाबत साखर कारखानदार जोपर्यंत सकारात्मक निर्णय घेत नाहीत तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून उठणार नसल्याची आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठेवली होती. काल (दि.२३) रात्री उशीरापर्यंत या मुद्द्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू होती. रात्री ८ च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ऊस दराची कोंडी फुटली आणि ८.३० नंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.