Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मोबाइल, गांजामुळे कारागृह पोलिसांची प्रतिमा मलीन : हसन मुश्रीफ

मोबाइल, गांजामुळे कारागृह पोलिसांची प्रतिमा मलीन : हसन मुश्रीफ



कोल्हापूर : खरा पंचनामा

कळंबा कारागृहात वारंवार गांजा आणि मोबाइल सापडतात. जिल्हा कारागृहातून कैदी पळून जातात. अशा घटनांमुळे कारागृह पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कळंबा कारागृहातील अधिका-यांना सुनावले. कारागृहाने आयोजित केलेल्या दिवाळी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री मुश्रीफ बोलत होते.

कळंबा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, खेळणी, शोभेच्या वस्तू आणि फर्निचर विक्रीचा दिवाळी मेळावा सोमवारी सुरू झाला. पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी कारागृहातील गैरप्रकारांवर बोट ठेवले.

'महाराष्ट्र कारागृह पोलिसांबद्दल अलीकडे वादळ उठलेले आहे. ते वादळ शमवण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे. जेलमध्ये मोबाइल पोहोचणे, ड्रग्स पोहोचणे, ललित पाटील याच्यासारखे कैदी बाहेर पडणे या घटना गंभीर आहेत. यामुळे मलीन झालेली प्रतिमा बदलण्यासाठी कारागृह पोलिस अधिका-यांनी काम करावे,' अशा शब्दात कान टोचण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केले. तसेच कारागृह पोलिस चांगले काम करून दाखवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.