निलंबित पोलिस अधिकाऱ्याची एकास हातोड्याने मारहाण
सांगली : खरा पंचनामा
बोरगाव (ता. वाळवा) येथे रस्ते कामावरून ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापकाला डांबर साहित्याची गाडी न पाठविल्याच्या कारणावरून मुंबई पोलिस दलातील निलंबित उपनिरीक्षकाने आपल्या साथीदारासह हातोड्याने मारहाण करून जखमी केले.
याबाबत जखमी जुबेर जमाल खान (वय ३४, सध्या रा. बोरगाव, मूळ रा. चंदेरीया- अमेठी, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलंबित पोलिस उपनिरीक्षक शंकर जयवंत पाटणकर आणि विक्रमसिंह पाटणकर (दोघे रा. बोरगाव) यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खान हा रस्ते काम करणाऱ्या कंपनीकडे व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. बोरगावच्या वीटभट्टी चौक परिसरात गाठून वरील दोघा संशयितांनी डांबर साहित्याची गाडी न दिल्याच्या कारणातून चिडून जाऊन शंकर पाटणकर याने माझ्या पेट्रोलपंपाच्या ठिकाणी डांबर साहित्याची चौथी गाडी कधी पाठवणार, असे म्हणत खान याला शिवीगाळ व दमदाटी करत साथीदाराच्या सोबतीने हातोड्याने मारहाण करून जखमी केले.
बोरगाव येथील शंकर पाटणकर हा मुंबई पोलिस दलात उपनिरीक्षक म्हणून सेवेत होता. तेथे त्याच्याविरुद्ध महिलेवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यावर निलंबित करण्यात आले. त्यानंतरही गुन्हे करण्याचा त्याचा सपाटा सुरूच आहे. त्याच्यावर सावकारी, अपहरण, मारहाण असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.