महागड्या दुचाकी लंपास करणारा अटकेत
६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कडेगाव, सांगोलासह अथणी (कर्नाटक) येथून महागड्या दुचाकी लंपास करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सहा लाख ४० हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
यातील एक अल्पवयीन असून, शुभम प्रकाश पवार (वय २८, रा. रांजणी ता. कवठेमहांकाळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जिल्ह्यात वाढलेल्या जबरी चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष पथक तयार केले आहे. पथकाला माहिती मिळाली की, संशयित शुभम पवार व त्याचा मित्र हे बिना नंबरप्लेट असलेल्या दुचाकीवरून रांजणी गावातून फाट्याच्या दिशेने येत आहेत. दोघे दुचाकीवरून तिथे आले. त्यांना पळून जाण्याची संधी न देता पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केल्यावर अल्पवयीन मुलगा व दत्ता नरळे यांनी कडेगाव येथून चोरी केल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत तिघांनी चार बुलेट, ३ हिरोहोंडा दुचाकी तर एक यामाहा दुचाकी कडेगाव, सांगोला (जि. सोलापूर) आणि अथणी (कर्नाटक) येथून चोरी केल्याची कबुली दिली. त्याला कडेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, संदिप गुरव, दिपक गायकवाड, सागर लवटे, बाबासाहेब माने, अमर नरळे, संदीप नलावडे, आमसिध्द खोत, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.