Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राष्ट्रवादीने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण टिकवलं असतं

राष्ट्रवादीने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण टिकवलं असतं



पुणे : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण  टिकवलं असतं, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.

ते पुण्यात बोलत होते. पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही जहरी टीका केली. पृथ्वीराज चव्हाणानां सुपारी देऊनच महाराष्ट्रात पाठविले होते. जर आम्ही निवडणुका एकत्र लढणार नव्हतो, तर अशा सरकारमध्ये राहण्यात काही अर्थ नव्हता, असं उत्तर खासदार सुनील तटकरे यांनी दिलं.

"मी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं. जर त्यावेळी आमचं सरकार पडलं नसतं तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण टिकवलं असतं. मला खात्री आहे की माझं सरकार जर पडलं नसतं, तर आम्ही दोघे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो असतो आणि 2014 मध्ये भाजपऐवजी आमचेच सरकार आले असते", असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. आम्ही सत्तेत असतो तर मराठा आरक्षणाचा प्रश्नदेखील मार्गी लावला असता, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.