विश्वचषकाचा थरार सुरु असताना बंदूक, तलवारीचा थरार; दारूच्या दुकानावर दरोडा
पुणे : खरा पंचनामा
रविवारी (दि.19) विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता. पुणेकर क्रिकेट विश्वचषकाचा थरार अनुभवत असताना उत्तमनगर परिसरातील नागरिकांनी बंदूक आणि तलवारीचा थरार अनुभवला.
रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अहिरे गेट येथील आर आर वाईन्स या दारुच्या दुकानात सहा अज्ञात तरुणांनी दरोडा टाकून लाखो रुपयांची रोकड चोरुन नेली. वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली.
दरोडेखोरांनी आर आर वाईन्स दुकानातून जवळपास तीन लाख रुपयांची रोख रक्कम व दारुच्या बाटल्या चोरुन नेल्या. दरोडेखोर दोन दुचाकीवरुन दरोडा टाकण्यासाठी आले होते. सहा जणांपैकी दोघांच्या हातात तलवार होती. त्यांनी 'जो कोणी मध्ये येईल त्याला मारुन टाकीन' अशी धमकी देत हातातील तलवार हवेत फिरवून दहशत निर्माण केली. त्यामुळे परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली.
दुचाकीवरुन आलेले आरोपी हे 20 ते 22 वयोगटातील असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली. गुन्हा घडल्यानंतर दुकानातील कर्मचारी मनोज मोरे यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.