'फडणवीस नाहीत तर मग कोण?'
कल्याण : खरा पंचनामा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. कल्याणमध्ये मनोज जरांगेंची जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला ते आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नव्हते ते समोर आले, त्यावर भाष्य केलं आहे.
यावेळी जरांगे म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नाहीत. तर, तो मधला माणूस कोण हे शोधलं पाहिजे. लाठीचार्ज करणारा कोण हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी शोधून काढावं, अशा मागणी मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
जालनातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलं आहे. त्यामुळे सरकार बनून सरकार इतकी शक्ती असणारा हा व्यक्ती कोण त्याचा शोध मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ते कल्याणमध्ये सकल मराठा समाजाच्या सभेत बोलत होते.
जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली. त्यावर आता जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'ज्यांनी मराठ्यांवर लाठीचार्ज केला. त्या जालन्याच्या पोलिस अधीक्षकांना मारल्याचे बक्षीस मिळाले असेल. निष्पाप जनतेवर कट रचून ज्यांनी हल्ला केला त्यांना बढती मिळणार असेल. तर याची माहिती घेईन. त्याच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे. मात्र, यातून कोणालाही सुट्टी मिळणार नाही अशी प्रतिक्रिया दोशी यांच्या बदलीनंतर मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.