Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

२४ डिसेंबर पर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावे जाहीर करू

२४ डिसेंबर पर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावे जाहीर करू



छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सरकार राज्यभर काम करत आहे, सरकारचं काम जोरात सुरू असल्याचं सांगितलं आहे. 'जे आमचं आहे, तेच सरकार आम्हाला देत आहे, आम्ही कोणाचाही घास हिरावून घेत नाही', असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

'आमच्याकडे पुरावे आहेत, त्यामुळे आरक्षण द्यावे लागेल. पुरावे आहेत तर दाखले मिळावेत हीच गावातील ओबीसींची भावना' असल्याचंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. 'मराठ्यांना पुरावे मिळू नयेत ही फक्त नेत्यांची भावना' आहे, असंही जरांगे यांनी पुढे म्हटलं आहे.

'आमच्या नोकऱ्या आम्हाला मिळाव्यात, ज्यांनी आमच्या नोकऱ्या हडपल्या त्यांना काढून टाकायला हवं, असंही ते पुढे म्हणालेत, आम्हाला आमच्या हक्काचं मिळायला हवं, २४ डिसेंबर पर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आरक्षणविरोधी त्यांची नावे जाहीर करू', असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

'ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देतांना आम्हाला मिळाल्या पाहिजे असं जरांगे म्हणाले आहे. ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यासह मिळणार राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळालं पाहिजे', असं जरांगे यांनी म्हटले आहे.

पुरावे असतानाही 40 वर्षे मराठा समाजाचं वाटोळं झालं. पण आता ज्यांच्याकडे पुरावे आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जातंय. आम्हाला आरक्षण मिळतंय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं मनोज जरांगे म्हणालेत. नेत्यांमुळेच मराठा समाजाचं नुकसान झाल्याचंही जरांगे यावेळी म्हणालेत.

आरक्षण मिळेपर्यंत मी फटाके वाजवणार नाही, आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केली, त्यांच्या घरात अंधार आणि मी आनंद कसा व्यक्त करू, मी दिवाळी साजरी करणार नाही असंही पुढे जरांगे म्हणालेत.

फडणवीसांच्या भेटीबाबतच्या प्रश्नावर मनोज जरांगे म्हणाले की, फडणवीस आरक्षण घेऊन आले तर त्यांच्या गळ्यातच पडतो. फडणवीस शहरात येणार आहे. त्यांना मी कस सांगू भेटायला या म्हणून, त्यांनी आरक्षण घेऊनच यावे, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आजही सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी येणार नाही. शिष्टमंडळाने पुन्हा उद्या पर्यंतचा वेळ मागितला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.