आजची सुनावणी संपली! ठाकरेंची कागदपत्रं खोटी असल्याचा जेठमलानींचा दावा
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणीला वेग आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजपासून पाच दिवस सुनावणी होणार आहे. आजच्या पहिल्या दिवसाची सुनावणी संपली असून आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी झाली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ही उलटतपासणी घेतली. तसेच ठाकरे गटाची कागदपत्रे ही खोटी असल्याचा दावाही त्यांनी केला.
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाची कागदपत्रे तपासली असून ती बनावट असल्याचा दावा त्यांनी केला. जेटमलानी म्हणाले, जेवढी कागदपत्रं ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्षांसमोर सादर केली आहेत ती सर्व बनावट आहेत. तसेच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या आमदारांची जी कागदपत्रे दिली आहेत, ज्यात त्यांनी शिंदेंच्या आमदारांनी सह्या केल्याचा दावा केला आहे तो देखील खोटा असल्याचं जेठमलानी यांनी म्हटलं.
ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रातील ठरावाची प्रत कुठे आहे? असा सवाल जेठमलानी यांनी सुनावणी दरम्यान केला. तसेच बोगस अपात्रता याचिकेसाठी असा ठरावच झाला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. तर शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची ठरावावरची सही वेगळी असल्याचा दावाही जेठमलानी यांनी केला.
तसेच शिवसेनेची जी घटना आहे ती सन १९९९ ची असून ती सध्या निवडणूक आयोगाकडं आहे. या घटनेनुसार, पक्षप्रमुख हे पदचं अस्तित्वात नाही. त्यामुळं जेठमलानी यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरेंकडून पक्ष प्रमुख म्हणून जे काही केलं गेलं आहे, ते पण चुकीचं आहे कारण असं कुठलंही पदच अस्तित्वात नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.