Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आयपीएस अधिकारी सुहेल शर्मा यांची सीबीआयकडे नियुक्ती

आयपीएस अधिकारी सुहेल शर्मा यांची सीबीआयकडे नियुक्ती



पुणे : खरा पंचनामा

आयपीएस अधिकारी तसेच पुणे पोलिस दलातील झोन ३ चे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांची सीबीआयकडे नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मा यांची प्रतिनियुक्तीवर ही बदली करण्यात आली आहे. बदलीचे आदेश गुरुवारी देण्यात आले आहेत. मात्र अद्याप त्यांच्या पोस्टिंगचे ठिकाण निश्चीत करण्यात आलेले नाही. 

सुहेल शर्मा यांनी कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर अनिकेत कोथळे खून प्रकरणानंतर त्यांची सांगलीच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. कोरोना काळात त्यांनी सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोखपणे पार पाडली होती. सांगली पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी खंडणीविरोधी पथक, ऑपरेशन मुस्कान यासह अनेक उपक्रम राबवले होते. जिल्ह्यातील महत्वाच्या शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात त्यांचाच पुढाकार होता. शिवाय मोठ्या शहरात त्यांनी पोलिस मदत केंद्रे उभारली होती. 

सांगली शहरात लेफ्ट फ्री ही संकल्पनाही त्यांनी राबवली होती. गणेशोत्सव काळात मुख्य रस्त्यांवर मूर्ती विक्रेत्यांमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी त्यांनी उपाययोजना केल्या होत्या. शर्मा हे देशातील पहिले एव्हरेस्टवीर आयपीएस अधिकारी म्हणून परिचित आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षणाच्या काळात त्यांनी तेथील विद्यार्थ्याना ट्रेकिंगचे धडेही दिले होते. सध्याच्या नूतन पोलिस अधीक्षक इमारतीचे काम त्यांच्याच कार्यकालात सुरू करण्यात आले होते. 

सांगलीतील कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली मुंबई येथील एटीएसच्या अधीक्षकपदी झाली होती. त्यानंतर दीड वर्षापूर्वी त्यांची पुण्यातील झोन ३ चे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली होती. आता त्यांची सीबीआयकडे (केंद्रीय अन्वेषण विभाग) प्रतिनुयुक्तीवर बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.