Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा! कोल्हापुरातील सकल मराठा समाजाची मागणी

छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा!
कोल्हापुरातील सकल मराठा समाजाची मागणी



कोल्हापूर : खरा पंचनामा

मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाविरोधात बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मंगळवारी दसरा चौकात झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा आंदोलकांनी केली आहे.

दसरा चौकात बुधवारी दुपारी बारा वाजता निषेध म्हणून भुजबळांच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक दहन करण्यात येणार असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे समन्वयक वसंतराव मुळीक आणि ॲड. बाबा इंदूलकर यांनी सांगितले.

भुजबळांनी मराठा समाजाविषयी केलेल्या विधानांमुळे आक्रमक सकल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी बाबा पार्टे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार राजी असताना त्यांचे मंत्री छगन भुजबळ वेगळी भाषा करतात, त्यामुळे त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे का. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांना फसविले ते मंत्रीमंडळात असतानाही सरकारविरोधात भूमिका घेतात याचा जाहीर निषेध आहे. त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, असे ते म्हणाले. वसंत मुळीक, दिलीप देसाई यानीही मत मांडले.

ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, भुजबळांसारखे मातब्बर मंत्री सरकारच्याच निर्णयाविरोधात बेताल, बेजबाबदार, दोन जातींत दुफळी माजवणारे आणि शांतता भंग करणारे वक्तव्य करतात. ते भाजपच्या हातातील किल्लीचे खेळणे बनले आहेत. ईडीची भीती दाखवून ते त्यांच्या स्क्रिप्टनुसारच वक्तव्य करायला लावत आहेत. १९६७ मध्ये यादीत नसताना भुजबळांच्या सांगण्यावरुन १९६८ मध्ये माळी समाज व पाटजाती यादीत कशी आली याचा खुलासा सरकारने करावा.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.