जेलचे गज कापून चार कैद्यांचे 'फिल्मी स्टाईल'नं पलायन
संगमनेर : खरा पंचनामा
संगमनेर शहर कारागृहाचे गज कापून बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पसार झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. 5) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अत्याचार प्रकरणातील रोशन थापा ददेल, अनिल ढोले, खुन प्रकरणातील देविदास काळे आणि मच्छिंद्र जाधव अशी पसार झालेल्या आरोपींची नावे आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहात सध्या अनेक कैदी शिक्षा भोगत आहेत. मंगळवारी (दि. 7) रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते. हे कर्मचारी बंदोबस्तात असतानाही कैदी जेलचे गज कापून पळून गेले. आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने जेलमधून पलायन केले.
बंदोबस्तावरील पोलिसांचे दुर्लक्ष व्हावं यासाठी जेलमध्ये मोठ मोठ्यानं गाणे आणि आरत्या सुरु होत्या. या गोंधळात चौघांनी जेलचे गज तोडले. ठरल्याप्रमाणे बाहेर एक कार आधीच येऊन थांबली होती. जेल तोडून कैदी या कारमधून पसार झाले. कारागृहातून कैदी पळाल्याने कारागृहात खळबळ उडाली आहे. पळून गेलेल्या चौघांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.