Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एक कोटी लाचप्रकरण; गुंगारा देणाऱ्या 'गणेश वाघ'ला अटक

एक कोटी लाचप्रकरण; गुंगारा देणाऱ्या 'गणेश वाघ'ला अटक



अहमदनगर : खरा पंचनामा

एक कोटी रुपयांच्या लाचप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार असलेला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला अटक करण्यात लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाला यश आले आहे. 12 दिवसांपासून शोधावर असलेल्या पथकाला गणेश वाघ याला मुंबईकडून धुळ्याकडे जात असताना अटक करण्यात यश आले. वाघ याला थोड्याच वेळात न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नगर कार्यालयात छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने काम केले होते. या कामाच्या उर्वरीत बिल मंजुरीसाठी गणेश वाघ याची बिलावर स्वाक्षरी गरजेचे होती. त्यावेळी गणेश वाघ हा नगरच्या कार्यालयात उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. गणेश वाघ याची बढतीवर बदली झाली. बिलावर स्वाक्षरीसाठी गणेश वाघ याने एक कोटी रुपयांची लाच मागितली. ही लाच नगर कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड याच्याकडे देण्यास सांगितले होते. अमित गायकवाड ही लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने त्याला अटक केली. यालाचेमागील प्रमुख सूत्रधार गणेश वाघ असल्याचे तपासात समोर आले. परंतु कार्यवाहीच्या 3 नोव्हेंबरच्या दिवसापासूनच पसार झाला. लाचलुचपत पथकाच्या नाशिक पथकाने गणेश वाघ याच्या शोधासाठी राज्य पिंजून काढले. तरी देखील सापडत नव्हता.

यातच गणेश वाघ याचे नातेवाईक देखील बेपत्ता झाले. गणेश वाघ बाहेर देशात पळून जावू नये यासाठी लाचलुचपत विभागाने लूक आऊट नोटीस बजावली होती. दिवाळीत देखील पथक गणेश वाघ याच्या शोध घेत होते. शेवटी आज दिवाळी पाडव्याला पथकाला गणेश वाघ याला अटक करण्यात यश आले. नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गणेश वाघ याच्या अटकेची नोंदीनंतर न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.