भुजबळांना मराठ्यांचे आरक्षण खुपायला लागले आहे : जरांगे
सांगली : खरा पंचनामा
गोदावरी खोरे संपन्न असल्याने त्या भागात लोक विस्थापित होवून रहायला येतात. मीही आलोय. मी सासऱ्याची भाकरी तोडतोय, अशी माझ्याबद्दल कुठल्यातरी माकडाने चुकीची माहिती भुजबळांना दिलीय. पण, लोकांचे खाल्ल्यानेच भूजबळ जेलमध्ये जावून आलेत. त्यांना मराठ्यांचे आरक्षण खुपायला लागले आहे. समाजात दंगली घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा पलटवार मनोज जरांगे पाटील यांनी आज येथे केला.
मनोज जरांगे-पाटील आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची आधी विटा येथे सभा झाली. त्यानंतर तासगाव येथे त्यांनी लोकांशी संवाद साधला. भर दुपारी तीन वाजता सांगलीत तरुण भारत क्रीडांगणावर त्यांनी सभेला संबोधित केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भुजबळांवर प्रतिहल्ला चढवला. भुजबळ यांनी अंबड येथील सभेत जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, 'मराठा ओबीसीत आला आहे, हे भुजबळांचा कळून चुकलंय. आता आम्ही चिडावे, यासाठी ते काहीपण बोलत आहेत. मी काय शिकलो, हे त्यांना काय करायचे? लोकांचे खाल्ल्याने ते जेलमध्ये जावून आले. तुम्ही लोकांचे पैसे खाता, रक्त पिता. आता भुजबळांचे वय झाले आहे, त्यामुळे ते बडबडत आहेत. मराठ्यांची एकजूट त्यांना खपत नाही. आता उत्तर द्यायला सक्षम आहोत, मात्र तुम्हाला उत्तर द्यायचे नाही. तुम्ही खालच्या पातळावरचे आहात.
भुजबळ कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. आम्ही तुमचा बायोडाटा गोळा केला आहे. आम्ही तुमच्या शेपटावर पाय दिला नाही, तुम्ही आमच्या पायावर पाय देवू नका. ओबीसी आरक्षणात येवू नये म्हणून हा खटाटोप सुरु आहे. ओबीसी आणि मराठ्यांत वितुष्ट येणार नाही, वाद होणार नाही. कुणबी नोंदी सापडल्या म्हणजे सातबारा मिळाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.