मराठा आरक्षणासाठी राष्ट्रपतींची भेट घेणार, विनायक राऊतांनी तारीख केली जाहीर
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. याप्रकरणी आजपासून जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यास विरोध केला जात आहे. या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विनायक राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील सध्याचा ज्वलंत विषय म्हणजे मराठा आरक्षण आहे. धनगर आरक्षणाचाही तेवढाच गंभीर प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे यासंदर्भात १८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार आणि खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे माहिती विनायक राऊत यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, " महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. मागच्या निवडणुकीत ज्या पक्षाने जागा जिंकल्या आहेत त्या जागा त्याच पक्षाला देण्यात येणार आहेत. काही अपवादात्मक परिस्थितीत येणाऱ्या निवडणुकीत ज्या पक्षाच्या उमेदवारात निवडून येण्याची क्षमता असेल, त्याला उमेदवारी दिली जाऊ शकते. शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत समोपचाराने जागा बदलण्याबाबत चर्चा झाली असून अपक्षांनाही जागा देण्यात येणार आहेत. अकोल्यातून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवणार आहेत आणि ते जिंकून येतील अशी शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.