छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर"; जरांगेंचा मोठा दावा
अहमदनगर : खरा पंचनामा
मराठा आरक्षणावरून सुरु असलेलं छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात दररोजच आरोप- प्रत्यारोप होत आहेत. त्यात आता जरांगेंच्या एका दाव्यानं खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना हे वक्तव्य केलं आहे.
"छगन भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची आहे," असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. जरांगे यांच्या या राजकीय वक्तव्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
नेवासा शहरात थोड्याच वेळात मनोज जरांगेंची जाहीर सभा होणार आहे. मात्र, सभेआधीच मनोज जरांगे यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीनं सभास्थळी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. रामेश्वर घोंगडे असं या व्यक्तीचं नाव असून ते धनगर समाजाचे आहेत. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी ते नेवासेत आले आहेत. मराठा आणि धनगरांना आरक्षण मिळेपर्यंत जरांगेंनी लढा सुरूच ठेवावा, अशी मागणी देखील जरांगे करणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.