ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांच्या विरोधात रविंद्र धंगेकर आक्रमक;
बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार
पुणे : खरा पंचनामा
ललित पाटील प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर हे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणात कारवाई करत नसल्याने मी बुधवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यासोबतच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणाल लक्ष घालत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ललित पाटील प्रकरणात ससुन रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. डॉक्टर ठाकूर यांना पदमुकक्त केल्यानंतर नवीन डीन डॉक्टर विनायक काळे यांना अजुनही पदभार दिलेला नाही. ससून हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. ससुन रुग्णालयातील कोणावरही पुणे पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे शासनाची नाचक्की होतेय. पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयातील क्लार्क महेंद्र शेवतेला अटक होण्याची गरज आहे. त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा होईल. पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणात कारवाई करत नसल्याने मी बुधवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार, असा इशारा त्यांनी दिली आहे.
यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील त्यांनी निशाणा साधला आहे. ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नाही आहे. पुणे पोलीसांना कोट्यावधी रुपयांचा हप्ता मिळतो. पुण्यात हुक्का पार्लय, पब, बार अशा अनेक ठिकाणी गैरप्रकार होतात. या गैर प्रकारावर आळा घालण्यात यावा, असंही ते म्हणाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.