Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सगळ्या जगाला माहितीय माझी जात कोणती!

सगळ्या जगाला माहितीय माझी जात कोणती!



बारामती : खरा पंचनामा

जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही, सगळ्या जगाला माहितीय माझी जात काय आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खोट्या जातीच्या दाखल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच, मराठा आरक्षणाबाबत  बोलताना मराठा तरुणांची भावना तीव्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत. आज दिवाळी पाडव्याचा गोविंदबागेतील कार्यक्रम आटोपल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "गेली 50 वर्षही पद्धत्त आहे. पाडव्याच्या दिवशी लोक बारामतीत येतात. गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झाली आहे. यंदाचं वर्ष वेगळं आहे. कारण यापूर्वी लोक पाडव्यासाठी यायचे, आता पाडव्यापूर्वी लोक येतात आणि सांगतात पाडव्याच्या दिवशी गर्दी खूप असते, त्यामुळे आम्ही आधीच येऊन भेटून जातो. आजकाल दोन दिवस आधीही लोक येतात. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण इथून लोक आले आणि शुभेच्छा दिल्या. यावर्षी अलेल्यांपैकी 70 टक्के लोक तरुण होते. हे या वेळचं वैशिष्ट्य. तरुणांच्या भवितव्यासाठी काय करता येईल त्याचा प्रयत्न करेन."

काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या जातीचा खोटा दाखला सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. याबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, "माझा जातीचा बोगस दाखला व्हायरल झाला होता. माझा इंग्रजीमधील दाखला काही जणांनी फिरवला. त्यावर ओबीसी लिहलं होतं. जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही. सगळ्या जगाला माहितीय आहे, माझी जात काय आहे. "

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.