Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरातून दुचाकी चोरणाऱ्यास अटक, ५ दुचाकी जप्त राजारामपुरी पोलिसांची कारवाई

कोल्हापुरातून दुचाकी चोरणाऱ्यास अटक, ५ दुचाकी जप्त
राजारामपुरी पोलिसांची कारवाई



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणांहून अल्पवयीन मुलाच्या साथीने दुचाकी चोरणाऱ्या एकास अटक करण्यात आली. त्याच्याकडून १ लाख २० हजारांची चोरीच्या ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. 

अमन जावेद पठाण (वय २०, रा. शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर विविध चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना निरीक्षक श्री. तनपुरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांचे एक पथक शनिवारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी दोघेजण दुचाकी घेऊन संशयास्पदरित्या फिरताना आढळले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. 

त्यांच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केल्यानंतर पठाण याने अल्पवयीन मित्राच्या मदतीने जुना राजवाडा परिसरातून तीन तर शाहुपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पठाण याला अटक करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. 

राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज जाधव, समीर शेख, विशाल खराडे, युक्ती ठोंबरे, सुशांत तळप, सुप्रिया कचरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.