पराभूत उमेदवारकडून हवेत गोळीबार; पोलिसांनाही केला जीवे मारण्याचा प्रयत्न
वालचंदनगर : खरा पंचनामा
ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये पराभव झाल्याने काझड (ता. इंदापूर) गावामध्ये दशहत निर्माण करण्यासाठी हवेमध्ये गोळीबार करुन पळून जात असताना पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी राहुल चांगदेव नरुटे व समीर मल्हारी नरूटे (रा. काझड) यांच्यावर गुन्हा दाखल केला. रविवारी ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या असून सोमवारी निकाल जाहीर झाले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये राहुल चांगदेव नरुटे व समीर मल्हारी नरूटे हे दोघे उभे होते.
दोघांचाही पराभव झाल्याने निकालानंतर सोमवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास राहुल नरुटे याने पिस्तुलामधून गोळीबार केल्याची घटना घडली. पोलिसांनी दोघाचा पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न करीत होते.
चौकामध्ये दोघांची गाडी अडवत असताना चारचाकी गाडी अंगावरती घालून पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार गणेश काटकर यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.