खासदार धैर्यशील माने हरवले; पेठवडगावात मराठा समाजाचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
पेठवडगाव : खरा पंचनामा
राज्यात मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाचे रान पेटवले आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशातच खासदार धैर्यशील माने हे मतदार संघात दिसून येत नाहीत.
त्यामुळेच वडगाव परिसरातील सकल मराठा समाजाच्यावतीने खासदार धैर्यशील माने हरविले आहेत. बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करावी. यासाठी पालिका चौक ते पोलिस ठाणे असा मोर्चा काढून पोलिस ठाण्यावर आले.
यावेळी खासदार हरविले त्यास शोधून द्या अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांनी मराठा समाजाचे म्हणणे ऐकून घेतले. पोलिसांनी अशी तक्रार घेण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर पुन्हा मोर्चेकरी पालिका चौकात आले. यावेळी आमचा खासदार हरविला आहे असा फलक घेऊन पालिका चौकात आले. नंतर हा फलक पोलिसांनी जप्त केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.