सांगलीत तरुणाचा सपासप वार करून खून
गोकुळनगरमधील घटना; संशयित पसार
सांगली : खरा पंचनामा
शहरातील गोकुळनगर एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. मंगळवारी रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान ही घटना घडली. खून केल्यानंतर संशयित पसार झाले. नेमका किती जनानी तसेच कोणत्या कारणावरुन हा खून केला याची माहिती रात्री उशिरापर्यंत समजली नव्हती.
विनोद किसन इंगळे (वय 30) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री तो गोकुळनगर येथील रिक्षा स्टॉपवर थांबला होता. त्यावेळी संशयितानी त्याच्यावर पाठीमागून हल्ला केला. त्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर निघून गेले.
याची माहिती मिळताच बघ्यानी गर्दी केली होती. सांगली शहरचे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पोलिसांनी गोकुळनगरमध्ये गेले. विनोद याला तातडीने सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.