स्वस्तात सोन्याच्या आमिषाने गंडा : जतमधील तीन पोलिस कर्मचारी निलंबित!
जत : खरा पंचनामा
स्वस्तात सोने देतो, असे सांगून आंध्रप्रदेशातील एका सराफाची साडेसव्वीस लाखाची फसवणूक केली होती. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता. ही घटना गुरुवारी (दि. २) नोव्हेंबर रोजी घडली होती. याच प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जतमधील तीन पोलिस कर्मचाऱ्याना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी केली आहे.
पोलिस शिपाई समीर जबरदस्त मुल्ला, विजय मच्छिंद्र नरळे, हवालदार महादेव तुळशीराम धुमाळ अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. आंध्र प्रदेशातील एका सराफास जत तालुक्यातील पाच जणांनी स्वस्तात सोने देतो, म्हणून बोलवून घेतले होते. यावेळी संबंधित व्यक्तीस सोने न देता त्याच्याकडील साडेसव्वीस लाखाची पैशाची बॅग लंपास केली होती. या घटनेदरम्यान समीर मुल्ला व अन्य एक पोलीस घटनास्थळी असल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. माजी आमदार विलासराव जगताप यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दरोडयाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.
या प्रकरणातील रमेश कोळी व अमोल कुलकर्णी यांना रविवारी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. तर अनिल सुतार यास वैद्यकीय कारणास्तव नोटीस देऊन कार्यवाही करण्यात आली होती. परंतु या प्रकरणातील मेहबूब जातगार, दऱ्यापा मिस्त्री हे दोघे आरोपी फरारी होते. या दोघांना आज अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी चौघांनाही पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.