Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवारांच्या दाखल्यावर 'मराठा' म्हणून उल्लेख; जयंत पाटलांनी नामदेव जाधवाना सुनावलं

शरद पवारांच्या दाखल्यावर 'मराठा' म्हणून उल्लेख; जयंत पाटलांनी नामदेव जाधवाना सुनावलं



मुंबई : खरा पंचनामा

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा तापला आहे. अशातच शरद पवार 'ओबीसी' असल्याचा दावा प्राध्यापक नामदेव जाधव यांनी केला आहे. नामदेव जाधवांनी सोशल मीडियावर एक प्रमाणपत्र शेअर केलं आहे.

त्यात शरद पवार हे 'ओबीसी' असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रतिक्रिया देत नामदेव जाधवांना सुनावलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, "हे अत्यंत चुकीचं प्रमाणपत्र आहे. नामदेव जाधव प्रसिद्धीसाठी शरद पवारांबद्दल गैरसमज पसरवत आहेत. तसेच, पवारांना बदनाम करण्याचा उद्योग करत आहेत. मूळ मुद्दयावर लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रयत्न दिसतोय. शरद पवारांच्या शाळेतील दाखल्यावर 'मराठा' म्हणून उल्लेख आहे."

"कुणीही शरद पवारांच्या प्रमाणपत्रावर बदल करून काहीही दाखवत असतील, तर महाराष्ट्रातून कार्यकर्ते तक्रारी दाखल करत आहेत. त्यामुळे चुकीचं पसरवणारे तक्रारींना तोंड देतील," असा इशारा जयंत पाटलांनी दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.