देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले जागा वाटप
मुंबई : खरा पंचनामा
सध्या पाच राज्याची विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीस लोकसभेची सेमीफायनल म्हटले जात आहे. या सेमीफायनलचे निकाल ३ डिसेंबर रोजी येणार आहे. दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात महायुतीकडून तयारी सुरु आहे. महायुतीत जागा वाटपाचा फार्मूला ठरला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तीन पक्षांत कोण किती जागा लढवणार आहे, हे निश्चित झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्यानुसार राज्यात भाजप २६ लोकसभेच्या जागा लढवणार आहे. तसेच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना २२ जागेवर आपले उमेदवार देणार आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जागा वाटपाचा फार्मूला ठरला आहे. त्यानुसार भाजप २६ जागांवर लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी २२ जागांवर लढतील. जागावाटपाचा हा फॉर्मूला निश्चित झाला असून त्यावर लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे," देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला फार्मूला शिवसेना आणि राष्ट्रवादी मान्य करणार का? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान राज्यात आरक्षणावरुन तणाव निर्माण झाला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. ओबीसी आरक्षणास धक्का लागणार नाही, हे त्यांनी या मुलाखातीत पुन्हा स्पष्ट केले.
महायुतीचा सर्व्हे नुकताच झाला आहे. भाजपचा वेगळा सर्व्हे राज्यात झाल्या आहे. गेल्यावेळी भाजप २५ जागा लढवल्या होत्या. त्यातील २३ जागा भाजपने जिंकल्या होत्या. सर्व्हेनुसार ज्या ठिकाणी जो पक्ष जिंकून येईल, त्या ठिकाणी त्या पक्षाला संधी दिली जाणार आहे. विदर्भात भाजप मजबूत आहे. त्या ठिकाणी भाजप जागा लढवणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी तर कोकण आणि मुंबईत शिवसेनेला जास्त जागा देण्यात येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.