Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कार, दुचाकी चोरणाऱ्या सराईतास अटक अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

कार, दुचाकी चोरणाऱ्या सराईतास अटक
अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथून कार, दुचाकी चोरणाऱ्या सराईतास अटक करण्यात आली. त्याच्याकडून तीन दुचाकी, मारूती कारचे स्पेअर पार्टस, रोकड असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून सांगलीतील तीन जयसिंगपूर आणि इचलकरंजीतील प्रत्येकी असे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

नागेश हणमंत शिंदे (वय २८, रा. कोरोची, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते. या पथकाला चोरीतील संशयितांना पकडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पथक चोरट्यांचा शोध घेत होते. 

पथकातील विक्रम खोत यांना कोरोची येथील नागेश शिंदे याने सांगलीतून चोरलेल्या वाहनांचे स्पेअर पार्टस त्याच्या घरासमोर ठेवल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. शिवाय हे स्पेअर पार्टस त्याने भंगारात विकल्याचीही माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने कोरोची येथे जाऊन पाहणी केली असता शिंदे याच्या घरासमोर काही दुचाकी तसेच वाहनांचे स्पेअर पार्टस आढळून आले. त्यानंतर नागेश शिंदे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगलीतून मारूती कार तसेच जयसिंगपूर आणि इचलकरंजी येथूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ती वाहने, स्पेअर पार्टस जप्त करून त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ रोकड सापडली. तीही जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. नागेश शिंदे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, अमर नरळे, मच्छिंद्र बर्डे, विक्रम खोत, संदीप नलवडे, उदय माळी, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.