Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जरांगे पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील पहिल्या सभेला विट्यात सुरुवात

जरांगे पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील पहिल्या सभेला विट्यात सुरुवात



विटा : खरा पंचनामा

सूर्यनारायणाच्या साक्षीनं उगवलेली सोनेरी सकाळ, सर्वत्र भगवे ध्वज अन टोप्या परिधान केलेला हजारोंचा मराठा बांधवांचा जनसमुदाय आणि कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत आणि सहकाऱ्यांमुळं निर्माण झालेले चैतन्य अशा एकूणच वातावरणात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला सांगली जिल्ह्यातील पहिल्या सभेला विट्यात सुरुवात झाली.

८ बाय १० फुटाचे व्यासपीठ, त्यावर सिंहासनाधीष्ठित छत्रपती शिवरायांची मोठी मूर्ती आणि फक्त लढ म्हण, या घोषवाक्यासह मनोज जरांगे यांची ५ बाय १५ फुटी प्रतिमा असलेला फलक. "कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय",' एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी" या घोषणांच्या जयघोषात शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्याला सुरुवात केली. शाहीर दिलीप सावंत यांनी गायलेल्या या पोवाड्यातील वाक्या- वाक्या नंतर लोकांत उसळलेल्या त्वेषाच्या लाटा अशा एकूणच परिस्थितीत विट्यातील मनोज जरांगे पाटील यांची सभा सुरू झाली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.