मराठा एकत्र येत नाहीत ही बातमी विट्यातील सभेने खोटी ठरवली
मनोज जरांगे पाटील
विटा : खरा पंचनामा
पश्चिम महाराष्ट्र बाबतीत एक चर्चा होती की, उशीर झाला की लोक सभेला थांबत नाही, हा पण रेकॉर्ड आज पश्चिम महाराष्ट्रने तोडला. मराठवाडा मध्ये एक चर्चा होती की पश्चिम महाराष्ट्र मधील मराठाना आरक्षणाची गरज नाही, ते एकत्र येत नाही. ही खोटी बातमी ज्यांनी पेरली त्याने आज सांगली जिल्ह्यातील सभा पाहावी. असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. ते विटा येथे बोलत होते.
ते म्हणाले, ज्या जातीने आरक्षण समजून घेतले त्यांना लगेच आरक्षण भेटले. मराठयानी आरक्षण समजून घ्यायला वेळ लावला. एकही गाव नाही जिथे आज मला थांबवले जात नाही. मराठाना डावलून जाणारी माझी औलाद नाही, मी सर्वांना भेटतो, म्हणून सभांना उशीर पोचतोय. 70 मध्ये आरक्षण होते, पण ओबीसी नेत्याचा दबाव होता, त्यामुळे पुरावे दडवले गेले. पण आज मराठाची एकजूट पाहून सरकारने पुरावे शोधायला सुरुवात केली.
आज लाखांने महाराष्ट्रभर नोंदी सापडली, आपण 70 टक्के लढाई जिंकलीय. आनंदाचा क्षण जवळ आलाय, पण मराठानी सावध रहा. 24 डिंसेंबर पण आपली कसोटी आहे, लेकरासाठी लढा आहे, शाततेत आंदोलन करा. आरक्षणसाठी आता इथून पुढे एकानेही आत्महत्या करू नका. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एक इंच ही मागे हटणार नाही. मतभेद आणि एकजूट तुटून देऊ नका, कुणाला कितीही प्रयत्न करू द्या. एका कुणबी नोंदीवर 200 लोकाचा फायदा होणार आहे.
1805 पासून 1967 ते 2023 पर्यत जे पुरावे सापडले ते आरक्षण जर 70 वर्षांपूर्वी आरक्षण दिले असते तर मराठा समाज आज प्रगत जात झाली असती. 70 वर्षात आम्हाला कुणी आरक्षण दिले नाही याचे उत्तर आम्हाला पाहिजे. 70 वर्षात सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना आमच्या बापजाद्यानी मोठे केलेय. आज लेकरांसाठी या नेत्यांच्या मदतीची गरज असतांना एकही नेता बोलायला तयार नाही. मराठा समाजाने निकष पूर्ण करून देखील त्यांना आरक्षण का नाही. शेती असलेल्या सर्वांना आरक्षण दिले , मराठा समाजाकडे देखील शेती, मग या समाजाला का आरक्षण नाही.
आरक्षण कुणी देऊन दिले नाही याचे नाव आम्हाला कळले पाहिजे. आरक्षण साठीचे सर्व निकष पूर्ण केलेत. मराठाची पोट जात कुणबी होत नाही का याचे उत्तर सरकारकडे नाही. शेतीची, कुणबी पणाची लाज ज्यांना वाटत असेल त्यांनी शेती विकून चंद्रावर राहायला जावे. मराठयाच्या त्सुनामी विरोधात जायचे कुणीही धाडस करणार नाही, पण जर गेलाच तर त्याला समजावून सांगा.
माझ्यावर दोन प्रयोग केले गेले
एक किडनीच नाही मला असे सांगितले गेले डॉक्टरांनी. मला आज शत्रू समजू लागलेत, माझी चुकी काय, मी मॅनेज होत नाही, कुणबी नोंदी शोधून काढल्या म्हणून मी शत्रू ठरलो काय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.