Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू पाच दिवसांनी घटना उघड; संशयितानी मृतदेह फेकले जंगलात

खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
पाच दिवसांनी घटना उघड; संशयितानी मृतदेह फेकले जंगलात



कोल्हापूर : खरा पंचनामा

खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा डुकरांच्या शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाला. राक्षी (ता. पन्हाळा) येथे बुधवारी (दि. ८) रात्री घडलेल्या दुर्घटनेचा सोमवारी सकाळी उलगडा झाला. 

जोतिराम सदाशिव कुंभार ( वय ६४ ) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय ६०, राक्षी) अशी मृतांची नावे आहेत. शिकारीसाठी तारा लावून मृतदेहांची विल्हेवाट लावणा-या सहा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मृतदेहांचा शोध सुरू आहे. 

जोतिराम आणि नायकू हे दोघे बुधवारी रात्री खेकडे पकडण्यासाठी धरणाचा ओढा परिसरात गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते परत आले नाहीत. दुस-या दिवशी मुलांनी ओढ्यालगत त्यांचा शोध सुरू केला. ड्रोनने शोध घेऊनही कुंभार बंधूंचा मागमूस मिळाला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी दोघे बेपत्ता असल्याची फिर्याद पन्हाळा पोलिस ठाण्यात दिली. तपास सुरू असताना धरणाचा ओढा परिसरात गावातील काही लोकांनी डुकरांच्या शिकारीसाठी विद्युत तारा लावल्या होत्या अशी माहिती पन्हाळा पोलिसांना मिळाली.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, कुंभार बंधूंचा तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर आले. शिकारीसाठी तारा लावणा-या सहा जणांनी घाबरून कुंभार बंधूंचे मृतदेह जवळच्या जंगलात फेकले आहेत. पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने मृतदेहांचा शोध सुरू आहे. या घटनेने पन्हाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.