Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे इसिस मॉड्यूलमधील उच्चशिक्षित दहशतवाद्यांकडून स्फोटकांसाठी कोडवर्डचा वापर

पुणे इसिस मॉड्यूलमधील उच्चशिक्षित दहशतवाद्यांकडून स्फोटकांसाठी कोडवर्डचा वापर



पुणे : खरा पंचनामा

शहरातील इसिस मॉड्यूल प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील आरोपी कादीर पठाण पुण्यात ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळत आहे.

त्याने साथीदार इम्रान खान आणि युनूस साकी यांनाही ग्राफिक्स शिकवले होते. आरोपी आपली ओळख लपून राहावी म्हणून ग्राफिकची कामे करुन पैसे कमवत होते, अशी माहिती 'एनआयए'कडून मिळत आहे. आरोपींनी 'आयईडी स्फोटक बनवण्यासाठी काही गोष्टी खरेदी केल्या होत्या. ज्यामध्ये काही केमिकल्स होती. या केमिकल्ससाठी ते कोडवर्डचा वापर करत असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.

दहशतवाद्यांनी सल्फरिक अॅसिडसाठी 'विनेगार' हा कोडवर्ड ठेवला होता. असेटॉन केमिकल्ससाठी 'रोजवॉटर' तर हायड्रोजन प्यारॉक्सॉइडसाठी 'शरबत' हा कोडवर्ड होता. या प्रकरणातील आरोपींना मोहम्मद नावाचा एक हँडलर ऑपरेट करत होता. तसेच आयईडी बॉम्ब बनवण्याचे काम आरोपींकडून युद्धपातळीवर सुरु होते, असे 'एनआयए'ने आरोपपत्रात म्हटले आहे.

'एनआयए'ने आरोपपत्रात सांगितल्यानुसार, पुणे इसिस मॉड्यूल प्रकणातील दहशतवादी उच्चशिक्षित असून, त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज होते. आरोपी जुल्फीकार अली एका मोठ्या आयटी कंपनीत कामाला होता. त्याला वार्षिक ३१ लाख रुपये पगार होता. उर्वरित आरोपींपैकी शाहनवाज शैफुजामा हा मायनिंग इंजिनिअर होता. त्याला स्फोटकांबद्दल माहिती असल्याने त्याचा वापर करुन त्याने बॉम्बची निर्मिती केली होती.

दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने सात आरोपींवर आरोपपत्र दाखल केले असून, त्यामध्ये मोहम्मद इमरान, मोहम्मद याकूब साकी, अब्दुल कदीर, नसीरुद्दीन काजी, जुल्फिकार अली, शमील साकिब नाचन आणि आकिफ अतीक नाचन यांचा समवेश आहे. यातील पाच आरोपी महाराष्ट्रातील आणि पुणे-मुंबई येथील आहेत तर दोघे मध्य प्रदेशमधील आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.