Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'एसएम'च्या माजी विद्यार्थ्याकडून जे. के. बसुगडे यांचा सत्कार

'एसएम'च्या माजी विद्यार्थ्याकडून जे. के. बसुगडे यांचा सत्कार



जयसिंगपूर : खरा पंचनामा

जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचतर्फे गेल्या ३५ वषार्पासून पत्रकारिता क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार जे. के. बसुगडे (सर) यांचा माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला होता. याबद्दल देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील एसएम हायस्कूल एंड ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याकडून श्री. बसुगडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.  

शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी मंत्री, माजी आमदार देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचची लक्ष्मीकांत ऊर्फ बंडा मणियार यांनी स्थापना केली आहे. या विचारमंचतर्फे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यावर्षीही मंचतर्फे विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गेली ३५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार जे. के. बसुगडे (सर) यांचा माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. 

श्री. बसुगडे यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल 'एसएम' (श्री महालक्ष्मी) हायस्कूल एंड ज्युनिअर कॉलेजच्या १९७६-७७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यानी गुरुवारी जयसिंगपूर येथे बसुगडे सर यांचा सत्कार केला. यावेळी सौ. कांचनमाला बसुगडे, माजी विद्यार्थी आकाराम माळी (खरसिंग), यशवंत वावरे (मोरगाव), अरूण बनसोडे (अलकूड), महादेव कोरे, श्री. भापकर (देशिंग) आदी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.