निष्पाप मुलांना फसवू नका, उद्यापासून 'ती' कारवाई बंद करा
जरांगे थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धडकले
बीड : खरा पंचनामा
जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीनंतर पोलिसांनी अनेकांना अटक करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहे. मात्र, पोलिसांकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आणि निष्पाप मुलांना अटक करण्यात येत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता.
आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निष्पाप मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकवू नका असे विनंती केली आहे. तसेच उद्यापासून निष्पाप लोकांना अडकवण्याची कारवाई बंद करण्यात यावी असेही जरांगे म्हणाले आहेत.
दरम्यान, पोलीस अधीक्षक यांच्या भेटीनंतर जरांगे म्हणाले की, "बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीत सहभागी नसलेल्या आणि ज्यांचा कोणताही या घटनेशी संबध नसतांना त्यांना अटक केली जात आहे. तसेच सरसकट त्यांच्यावर जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 307 नुसार गुन्हे दाखल केले जात आहे. काही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर देखील पुन्हा त्यांना पोलीस कोठडीत टाकले जात आहे. त्यामुळे आज बीडच्या पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा त्यांच्याकडे विनंती केली आहे. ज्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे त्यांच्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. मात्र, ज्यांचा सहभाग नाही अशा तरुणांना विनाकारण त्रास का दिला जात आहे, असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.