आधी फॉर्म्युला सांगितला, नंतर पलटी मारली!
नागपूर : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी महायुतीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 26 जागांवर तर शिंदे आणि अजितदादा गट 22 जागांवर लढणार होती.
या फॉर्म्युल्याची बातमी आल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे फडणवीसयांनी लगेच पलटी मारली आहे. आता फडणवीस यांनी असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
आमच्या चर्चा अजून व्हायच्या आहेत. फॉर्म्युला चर्चेनंतरच ठरेल. जो पक्ष ज्या सीट लढला आहे, त्या सीट त्याच्याकडे जाव्यात हा जागा वाटपाचा आधार असेल. पण जागा वाटपाचा हा आधार असला तरी याचा अर्थ ते स्टॅटिक आहे का? तर तसं नाही. त्यात आवश्यक ते बदलही आम्ही आपआपसात बसून करणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.