Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भुजबळांचे टेन्शन वाढले! महाराष्ट्र सदन घोटाळय़ाची सुनावणी फास्ट ट्रॅकवर

भुजबळांचे टेन्शन वाढले! महाराष्ट्र सदन घोटाळय़ाची सुनावणी फास्ट ट्रॅकवर



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात मिंधे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. या घोटाळय़ाचा खटला जलदगतीने चालवला जाईल. यापुढे अपरिहार्य कारणाशिवाय या खटल्याची सुनावणी तहकूब करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका विशेष न्यायालयाने गुरुवारी घेतली.

त्या अनुषंगाने छगन भुजबळांसह इतर सर्व आरोपींना निर्देश देत न्यायालयाने खटल्याची पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी निश्चित केली आहे.

ईडीने 2016 मध्ये छगन भुजबळ, पंकज भुजबळ व समीर भुजबळ यांच्यासह एकूण 52 आरोपींविरुद्ध 850 कोटींचा महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा तसेच इतर गैरव्यवहार प्रकरणांत आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींन्वये गुन्हा दाखल केला होता. या घोटाळय़ाच्या खटल्याची सुनावणी सध्या आमदार-खासदारांच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे.

गुरुवारच्या सुनावणीवेळी जामिनावर बाहेर असलेले छगन भुजबळ यांच्यासह अनेक आरोपी गैरहजर होते. यावेळी सुनावणी तहकूब करण्याबाबत बहुतांश आरोपींच्या वकिलांनी अर्ज सादर केले. त्याची गंभीर दखल घेत न्यायाधीश रोकडे यांनी सर्व आरोपींना कडक शब्दांत समज दिली.

लोकप्रतिनिधींचा सहभाग असलेले खटले जलदगतीने चालवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. त्यामुळे यापुढे अपरिहार्य कारणाशिवाय महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळय़ाची सुनावणी तहकूब केली जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यासंदर्भात रोजनाम्याद्वारेही स्पष्ट निर्देश देत पुढील सुनावणी 11 डिसेंबरला ठेवली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.