लक्ष्मीपूजन दिवशीच चोरट्यांनी सात घरे फोडली; शिराळा तालुक्यातील घटना
शिराळा : खरा पंचनामा
रविवारी लक्ष्मी पूजनादिवशीच शिराळा तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला. तीन गावात सात घरे फोडण्यात आली. यामध्ये चोरट्यानी सुमारे दहा तोळे, वीस हजार रोख आणि दोन दुचाकी असा साडे सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत कोकरुड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रविवारी घरोघरी लक्ष्मीपूजनची धामधूम होती. मध्यरात्रीच्या सुमारास समतानगर, गवळेवाडीमध्ये चोरट्यांनी घरे फोडून ऐवज लंपास केला. याबाबतची माहिती हत्तेगावचे पोलीस पाटील विट्ठल उंडाळकर यांनी कोकरुड पोलिसांना दिली. कोकरुड पोलिसानी घटनास्थळाची पाहणी केली. येळापुर ते गवळेवाडी या तीन किलोमीटर अंतरात एकाच रस्त्यावर तीन गावात घरे फोडण्यात आली आहेत. असाच प्रकार काही महिन्या पूर्वी शिराळा-कोकरुड रस्त्यावर झाला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.