Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुढील तीन दिवस थंडीचे; किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज

पुढील तीन दिवस थंडीचे; किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज



पुणे : खरा पंचनामा

दिवाळीपासून हवेतील गारव्यात वाढ झाली असून सध्या राज्यभरात कोरडे वातावरण आहे. पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागांत किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नाही. त्यामुळे 23 नोव्हेंबरपर्यंत किमान तापमानात घट होण्याचा कल कायम राहील.

सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवेल. राज्यात 23 नोव्हेंबरपासून आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल.

दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे.

राज्यात रविवारी सर्वांत कमी 14 अंश सेल्सिअस तापमान जळगावात नोंदवले गेले, तर रत्नागिरीत सर्वाधिक 35.6 अंश सेल्सिअस तापमान होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.