गुंतेगाव येथे वाळू तस्करीचा पर्दाफाश
पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त, चकलांबा पोलिसांची कारवाई
बीड : खरा पंचनामा
जिल्ह्यातील गुंतेगाव येथे गोदावरी नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. गुरुवारी पहाटे चकलांबा पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी पोलिसांची चाहूल लागल्यानंतर तस्कर पसार झाले. पोलिसांनी वाळू, एक हायवा डंपर, चार डिपर असा पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर वाहनांच्या चालकांना अटक करण्यात आली.
चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे व पोलीस अधीक्षक पथकाचे प्रमुख गणेश मुंडे यांना गोदा पात्रांमध्ये अवैध वाळूचे उत्खनन होऊन त्याची बेकायदेशीर चोरटी वाहतूक होत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. सहायक निरीक्षक एकशिंगे व पोलीस अधीक्षक पथकाचे गणेश मुंडे यांची गुरुवारी पहाटे 4.30 वाजता गुंतेगाव येथील गोदावरी नदी छापा टाकला. यावेळी तस्कर पसार झाले मात्र वाहनांच्या चालकांना अटक करण्यात आली. यावेळी पथकाने एक हायवा डंपर, चार टिपर व त्यांचे चालक, मोठ्या प्रमाणावर उत्खन केलेला वाळू साठा असा पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला. भल्या पहाटे केलेल्या कारवाईमुळे वाळू तस्कराचे धाबे दनानले आहेत.
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे, विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे, उपनिरीक्षक अनंता तांगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चांदमारे, श्री. येळे, श्री. खटाणे, श्री. सुरवसे, श्री. पवळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.