Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चक्क पोलिसच निघाला अट्टल दुचाकीचोर !

चक्क पोलिसच निघाला अट्टल दुचाकीचोर !



निरा : खरा पंचनामा

निरा (ता. पुरंदर) येथील पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक त्रासले होते. तर वाढत्या दुचाकी चोऱ्या रोखण्याचे मोठे आव्हान जेजुरी पोलिसांपुढे होते.

पोलिसांनी तपासाला गती देत दुचाकीचोरास पकडले देखील; मात्र चौकशीत धक्कादायक गोष्ट समोर आली. ती म्हणजे हा दुचाकी चोरणारा दुसरा-तिसरा कोणी नाही तर चक्क पोलिस कर्मचारीच निघाला. त्याच्याकडून चोरी केलेल्या तब्बल 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या, तर त्या विकत घेणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

विनोद मारुती नामदार (रा. वाणेवाडी, ता. बारामती) असे दुचाकी चोरणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्या अस्लम मुलाणी (रा. निरा, ता. पुरंदर) आणि पृथ्वीराज ठोंबरे (रा. मुरूम, ता. बारामती) या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरा हद्दीतील दुचाकी चोरीप्रकरणी तांत्रिक तपास व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून विनोद नामदार याचा सहभाग दिसून आला. त्याला जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत नामदार ने 8 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. नामदार हा पुणे पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. तो मूळचा वाणेवाडी येथील रहिवासी आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.