Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इस्लामपूर राज्य उत्पादन शुल्कच्या झोपा पोलिसांची कारवाई मात्र विभाग थंडावलेलाच, गोवा बनावट दारू तस्करीला चाप कोण लावणार

इस्लामपूर राज्य उत्पादन शुल्कच्या झोपा
पोलिसांची कारवाई मात्र विभाग थंडावलेलाच, गोवा बनावट दारू तस्करीला चाप कोण लावणार



सांगली : खरा पंचनामा

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा इस्लामपूर विभाग झोपा काढत असल्याचे चित्र आहे. इस्लामपूर पोलिस कंटेनरभरून गोवा बनावटीची दारू जप्त करत असताना उत्पादन शुल्कचा इस्लामपूर विभाग थंडावलेलाच आहे. त्यामुळे गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीसह हातभट्ट्या, बनावट विदेशी दारू निर्मिती, विक्री याला चाप कोण लावणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

काही वर्षापूर्वी इस्लामपूर विभागातील पेठ येथील बनावट दारू निर्मितीचा कारखाना सांगलीतील पथकाने उध्वस्त केला होता. त्यानंतर या परिसरातील बनावट दारू विक्रीला चाप लागला होता. गेल्या वर्षी राज्य उत्पादन शुल्कच्या इस्लामपूर विभागाने गोवा बनावटीची दारू जप्त केली होती. त्यातील आरोपींना अटकही केली होती. मात्र शौचाच्या बहाण्याने यातील काही आरोपी कोठडीतून पळून गेले होते. इतके मोठे प्रकरण होऊनही केवळ दोन कर्मचारी निलंबित करण्यापलिकडे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. शिवाय यातील दारू तस्करांशी काही व्यवहार झाल्याचाही आरोप करण्यात आला होता. मात्र त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नव्हती. 

काही महिन्यांपूर्वी इस्लामपूर पोलिसांनी पेठ नाका येथे दोनदा कंटेनरभरून गोवा बनावटीची दारू जप्त केली होती. गोवा बनावटीच्या दारू तस्करीची माहिती पोलिसांना मिळते तर उत्पादन शुल्कच्या इस्लामपूर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना का मिळत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय पुणे-बंगळूरू महामार्गावर सातारा उत्पादन शुल्कनेही कारवाई केली होती. मग कारवाई न करण्यासाठी उत्पादन शुल्कच्या इस्लामपूर विभागाचे हात कोणी बांधले आहेत का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. किरकोळ आणि फुटकळ कारवाया करण्यातच उत्पादन शुल्कचा इस्लामपूर विभाग समाधान मानत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. 

सर्वच पातळीवर निष्क्रीय ठरलेल्या इस्लामपूर विभागाची वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे वरीष्ठ आता हा प्रकार किती गांभिर्याने घेतात याकडे इस्लामपूरकरांचे लक्ष लागून राहीले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.