अजित पवारांनंतर जयंत पाटील यांनाही डेंग्यूची लागण
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूने त्रस्त आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील डेंग्यूची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी 'X' वरून याबाबत माहिती दिली आहे.
जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अंकाऊटवर ब्रीच कँडी रूग्णालयाच्या रिपोर्टचा फोटो शेअर केला आहे. या फोटो सोबत, 'कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यूची झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरूवात करेन,' असे लिहिले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.