Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोम्बिंग ऑपरेशनवेळी कोल्हापुरात धारदार शस्त्रे जप्त दोघांना अटक, राजारामपुरी पोलिसांची कारवाई

कोम्बिंग ऑपरेशनवेळी कोल्हापुरात धारदार शस्त्रे जप्त
दोघांना अटक, राजारामपुरी पोलिसांची कारवाई



कोल्हापूर : खरा पंचनामा

दिपावलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनवेळी दोघांना अटक करून तब्बल १८ धारदार शस्त्रे, एक मोपेड असा ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सण, उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. 

राहुल संतोष घोलप (वय १९, रा. राजेंद्रनगर), सोहेल महमद हुसेन मलबारी (वय ३०, रा. सुभाषनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर गुरूदत्त शांतीनाथ पोळ (रा. जवाहरनगर) हा पसार झाला. दिपावली तसेच अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलिस ठाणे हद्दीत गुरुवारी रात्री उशीरा कोम्बींग आपरेशन राबवण्यात आले. त्यावेळी राजेंद्रनगर, जवाहरनगर, सुभाषनगर येथील लॉज, बार येथे तपासणी करण्यात आली. रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात आले. 

राजेंद्रनगर येथे राहुल घोलप याच्याकडे यावेळी १२ घातक शस्त्रे सापडली. तर सुभाषनगर येथे सोहेल मलबारी याच्याकडे एक मोपेड, कोयता सापडला. गुरूदत्त पोळ याच्या गरेजमध्ये ६ घातक शस्त्रे सापडली. मात्र तो पसार झाला. या ऑपरेशनवेळी पोलिसांनी एडका, तलवारी, चाकू, कोयता अशी १८ धारदार शस्त्रे जप्त केली. 

कोल्हापूर शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी तसेच शहरातील अन्य पोलिस ठाण्यातील अधिकारी, कमर्चाऱ्यांनी ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.