गगनबावड्यात ४८ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त
राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाची कारवाई
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर गगनबावड्याजवळ गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा एक ट्रक पकडून ४८ लाखांची दारू जप्त करण्यात आली. यामध्ये दारू, ट्रकसह ६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राजस्थान येथील एकाला अटक करण्यात आल्याची माहिती कोल्हापूरचे अधीक्षक रविंद्र आवळे यांनी दिली.
नाहर कान सिंग (वय ३३, रा. वल्लभनगर, उदयपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्कचे शाहुवाडी येथील निरीक्षकांना एका ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर त्यांच्या पथकाने कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर गस्त वाढवली होती. बुधवारी सकाळी पथकाला माहिती मिळाल्यानुसार एक ट्रक (जीजे ०१ जेटी ७९७३) आला. पथकाने तो अडवला.
ट्रक चालकाकडे गाडीतील मालाबाबत चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांच्या १८० मिलीच्या ४८ हजार बाटल्या भरलेले हजार बॉक्स आढळले. त्यानंतर ती दारू जप्त करून ट्रक चालकाला अटक करण्यात आली.
कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, कोल्हापूरचे अधीक्षक रविंद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नंदकुमार देवणे, दुय्यम निरीक्षक शंकर रणपिसे, क्रांतिसिंह माने, मनोज पोवार, मोहन पाटील, कृष्णात पाटील, बालाजी गिड्डे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.