Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फसवून मोबाईल लंपास करणाऱ्यास अटक एक लाखांचा मुद्देमाल जप्त, राजारामपुरी पोलिसांची कारवाई

फसवून मोबाईल लंपास करणाऱ्यास अटक
एक लाखांचा मुद्देमाल जप्त, राजारामपुरी पोलिसांची कारवाई



कोल्हापूर : खरा पंचनामा

फसवणूक करून मोबाईल लंपास करणाऱ्या तरूणास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक मोबाईल, एक मोपेड असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. 

रोहित सुरेश पोवार (वय २१, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सचिन मोहनपुरकर यांचा मोबाईल दि. २१ नोव्हेंबर रोजी एकाने फसवून लंपास केला होता. याबाबत त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर निरीक्षक श्री. तनपुरे यांनी चोरट्याला अटक करण्याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या. 

पथक चोरट्याचा शोध घेत असताना एकजण शेंडा पार्क परिसरात चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून रोहित पोवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. चोरीचा मोबाईल तसेच त्याच्याकडील मोपेड जप्त करून त्याला अटक करण्यात आली. 

कोल्हापूर शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज जाधव, समीर शेख, विशाल खराडे, युक्ती ठोंबरे, सुशांत तळप आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.