Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मध्य प्रदेशात काँग्रेस बाजी मारणार! एक्झिट पोलचे निकाल समोर

मध्य प्रदेशात काँग्रेस बाजी मारणार! 
एक्झिट पोलचे निकाल समोर



भोपाल : खरा पंचनामा

देशातील पाच राज्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. शेवटच्या दिवशी, म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी तेलंगणात विधानसभेच्या 119 जागांसाठी मतदान झाले. हे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर येऊ लागले आहेत.

येत्या 3 डिसेंबर रोजी सर्व राज्यातील मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी एक्झित पोलमधून निकालांचा अंदाज लावला जात आहे. एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशातकाँग्रेस बाजी मारण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेसला येथे 111-121, तर भाजपला 106-116 जागा मिळण्याची शक्यता आहे.

इंडिया टुडे माय अॅक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशमध्ये भाजपला 106-116, काँग्रेसला 111-121 आणि इतरांना 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. येथे काँग्रेसला 40-50 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 36 ते 46 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. 2018 च्या निवडणुकीत भाजपला 109, काँग्रेसला 114, बसपाला 2 आणि इतरांना 7 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे काही आमदार भाजपात सामील झाल्यामुळे काँग्रेसची सत्ता कोसळून भाजपची सत्ता आली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.