सांगलीत डॉक्टरचा बंद बंगला फोडला
22 तोळे सोन्याचे, 8 किलो चांदीचे दागिने लंपास
सांगली : खरा पंचनामा
विश्रामबाग परिसरातील पद्मावतीनगर येथील डॉक्टरांचा बंद घराच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. तब्बल २२ तोळे सोने, ८ किलो चांदीचे दागिने चोरट्याने लंपास केले.
याप्रकरणी मृदुला हरिभाऊ साळुंखे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. काल सोमवारी सव्वाचारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विश्रामबाग परिसरातील वैष्णवी पॅथालॉजीचे डॉ. वैभव माने यांचा पद्मावतीनगरमध्ये ओम गोविंद नावाचा बंगला आहे. त्याठिकाणी डॉ. माने, त्यांच्या पत्नी डॉ. माधुरी माने, मुलगा आणि आई असे चौघेजण राहण्यास आहेत. १६ डिसेंबर रोजी डॉ. माने हे कुटुंबासह आसाम येथे सहलीसाठी गेले होते. त्यावेळी याबाबतची माहिती त्यांनी त्यांची बहिण फिर्यादी मृदुला साळुंखे यांना दिली होती.
दरम्यान, घराच्या परिसरातील बागेत काम करणारे माळी मल्लिकार्जुन गुड्डापुरे यांना परिसरातील कुंड्या विस्कटलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यांना तातडीने संशय आल्याने डॉ. माने यांना माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी मृदुला या घरी आल्या. त्यावेळी घराच्या मागील बाजूस असणाऱ्या लोखंडी खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी प्रवेश केल्याचे दिसून आले. त्यानंतर आत पाहणी केली असता चोरट्यांनी ८ किलो चांदीच्या वस्तू त्यात ताट, वाट्या, चमचे, समई, दिवा यांचा समावेश आहे. तसेच पाच तोळ्याच्या बांगड्या, सहा ग्रॅमची चेन, सहा तोळ्याचे नेकलेस, अडीच तोळ्याचे पाच कानातले जोड, सहा ग्रॅमची अंगठी असे बावीस तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.