Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सातारा पोलिस दलाने पटकावले पुरुष व महिला गटाचे सर्वसाधारण विजेतेपद बेस्ट अ‍ॅथलिस्ट कोल्हापूरच्या अमृत तिवले व सोनाली देसाई यांना दुचाकी; उत्कृष्ट शिस्तीमध्ये सोलापूर शहर तर उत्कृष्ठ मार्चपासमध्ये सांगली अव्वल 49 व्या कोल्हापूर परिक्षेत्रिय पोलिस क्रिडा स्पर्धा

सातारा पोलिस दलाने पटकावले पुरुष व महिला गटाचे सर्वसाधारण विजेतेपद
बेस्ट अ‍ॅथलिस्ट कोल्हापूरच्या अमृत तिवले व सोनाली देसाई यांना दुचाकी; उत्कृष्ट शिस्तीमध्ये सोलापूर शहर तर उत्कृष्ठ मार्चपासमध्ये सांगली अव्वल
49 व्या कोल्हापूर परिक्षेत्रिय पोलिस क्रिडा स्पर्धा



सोलापूर : खरा पंचनामा

सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयाने आयोजित केलेल्या 49 व्या कोल्हापूर परिक्षेत्रिय पोलिस क्रिडा स्पर्धेचे पुरुष व महिलांचे सांघिक सर्वसाधारण विजतेपद सातारा पोलिस दलाने पटकाविले. या स्पर्धेत बेस्ट अ‍ॅथलिस्ट म्हणून कोल्हापूरच्या अमृत तिवले व सोनाली देसाई यांनी पहिल्यांदाच दुचाकी मिळविली. तर उत्कृष्ठ शिस्तीचे सोलापूर शहरने आणि उत्कृष्ठ मार्चपासचे बक्षिस सांगली पोलिसांनी पटकाविले.


5 डिसेंबरपासून सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयाच्यावतीने 49 व्या कोल्हापूर परिक्षेत्रिय पोलिस क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण रविवारी सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या क्रिडांगणावर झाले. या बक्षिस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख उपस्थित होते. 


याप्रसंगी सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे ग्रामीणच्या पथकांनी उत्कृष्ठ संचलन सादर केले. यावेळी सोलापूरच्या थोरला मंगळवेढा तालीम लेझीम संघाने लेझीमचा मर्दानी खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. 

सोलापूरचे पोलिस आयुक्‍त डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर पोलिसांनी या स्पर्धांचे उत्कृष्ठ नियोजन केले होते. पुढीलवर्षी परिक्षेत्रिय पोलिस क्रिडा स्पर्धा कोल्हापूर येथे होणार असून त्याबाबतचा ध्वज विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी कोल्हापूरचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांना प्रदान केला. 

या कार्यक्रमास सोलापूरचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी, कोल्हापूरचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, सांगलीचे पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, साताराचे पोलिस अधिक्षक समीर शेख, सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलिस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहायक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी व श्‍वेता हुल्ले यांनी केले. या बक्षिस वितरण समारंभास पोलिस दलातील अधिकारी, खेळाडू, त्यांचे कुटुंबिय, नागरीक उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल असा :
सांघिक खेळ (पुरुष) : 
हॉकी : कोल्हापूर (प्रथम), सांगली (द्वितीय). फुटबॉल : सातारा (प्रथम), कोल्हापूर (द्वितीय). व्हॉलीबॉल : सातारा (प्रथम), सांगली (द्वितीय).
बास्केटबॉल : सोलापूर शहर (प्रथम), कोल्हापूर (द्वितीय). हॅन्डबॉल : सांगली (प्रथम), सोलापूर शहर (द्वितीय). कबड्डी : पुणे ग्रामीण (प्रथम), सांगली (द्वितीय). खो-खो : सांगली (प्रथम), सोलापूर शहर (द्वितीय).
सांघिक खेळ (महिला) :
व्हॉलीबॉल : कोल्हापूर (प्रथम), सातारा (द्वितीय). बास्केटबॉल : सातारा (प्रथम), कोल्हापूर (द्वितीय).
कबड्डी : कोल्हापूर (प्रथम), पुणे ग्रामीण (द्वितीय). खो-खो : सोलापूर ग्रामीण (प्रथम), कोल्हापूर (द्वितीय).

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.