महाराष्ट्रातील एका गावात दिवस असतो फक्त 6 ते 7 तासाचा!
अहमदनगर : खरा पंचनामा
आपल्या महाराष्ट्रात असे अनेक गाव आहेत. जिथे प्रत्येक गावाचा एक इतिहास असतो. एक वेगळं नवल असत. पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे सूर्योदय हा दोन ते अडीच तास उशिरा होतो आणि सूर्यास्त दोन-अडीच तास आधी होतो. त्यामुळे या गावातील दिवस हा केवळ 6 ते 7 तासाचा असतो.
सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेल हे 'फोफसंडी' नावाचे गाव हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील आहे. 1200 लोकसंख्या असलेल्या या गावास निसर्गाची साथ चांगलीच लाभलेली आहे. या गावात नदी, धबधबा, हिरवाई, डोंगर असल्याने गर्द हिरवी वनराई, दुर्मिळ पशु-पक्षी, जैववैविध्य आढळते. त्यामुळे या गावातील लोक अगदी आनंदाने येथे राहतात.
गावाचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात हे काही उगवेल ते कमवून ही लोक पुणे - ठाणे यासारख्या ठिकाणी आठ महिने रोजदारीसाठी जातात. या गावाची विशेषता ही अशी की या गावात एकूण बारा वाड्या व बारा आडनावाचे लोक येथे राहतात. यामध्ये वळे, पिचड, कोंडार, भगत, तातले, गोरे, उंबरे, गवारी, मेमाणे, भांगरे व भद्रिके अशी आडनावाची लोक इथे राहतात. गावात मुख्यतः भात, नागली, वरई पिके घेतली जातात.
गावाला निसर्ग प्रसन्न आहे. त्यामुळे येथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मात्र, रस्ता, पाणी, वीज यासारख्या भौतिक गरजांची कमतरता येथे आहे. येथे प्रत्येकाला या सुविधा मिळत नाहीत. पुरेसे पाणी नसल्यामुळे या गावात इतर पिके घेता येत नाहीत. या गावातून मांडवी नदीचा उगम होतो. पावसाळ्यात या गावात तुफान पाऊस पडतो. त्यामुळे येथे असलेला फोफसंडीचा धबधबाही खूप लोकप्रिय आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.